निर्माते धीरजलाल शाह यांचे निधन ; अजय देवगण, सनी देओलच्या चित्रपटांची केली होती निर्मिती

12 Mar 2024 18:45:08
निर्माते धीरजलाल शाह यांचे निधन, सनी देओल, सुनील शेट्टीच्या अनेक चित्रपटांची केली होती निर्मिती
 

Dhirajlal Shah 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते धीरजलाल शाह (Dhirajlal Shah) यांचे दु:खद निधन झाले. ११ मार्च रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धीरजलाल शाह (Dhirajlal Shah) यांनी अजय देवगण, सनी देओल यांच्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. धीरजलाल शाह यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
 
 
 
९० च्या दशकात अनेक हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट करण्यामागे निर्माते धीरजलाल शाह यांचा हात होता. धीरजलाल शाह यांची बॉलिवूडमध्ये 'व्हिडीओ किंग' या नावानेदेखील ओळख होती. आजवर धीरजलाल यांनी अजय देवगणच्या विजयपथ, अक्षय कुमारच्या खिलाडी या श्रृंखलेतील चित्रपट, सनी देओल, प्रियांका चोप्रा आणि प्रीती झिंटाची भूमिका असलेल्या 'द हीरो: लव स्टोरी ऑफ ए स्पाय' या चित्रपटाची देखील निर्मिती केली होती. याशिवाय सुनील शेट्टी यांचा 'कृष्णा', गोविंदाचा 'गॅम्बलर' या चित्रपटांचीही निर्मिती केली होती.
Powered By Sangraha 9.0