डोंबिवली : डोंबिवली निवासी विभागात मोठय़ा प्रमाणावर रासायनिक प्रदूषण होत असल्याची ओरड स्थानिक रहिवाश्यांकडून केली जात असताना कामा असोसिएशनने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
डोंबिवली एमआयडीसी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या रासायनिक प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत आहे. याबाबत नागरिकांनी एमपीसीबी कल्याण कार्यालयातील अधिकारी वर्गाला निवदेन दिले आहे. नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याना दिले जाणार आहे. त्यानंतर ही प्रदूषणात घट न झाल्यास येत्या लोकसभा निवडणूकीत उमेदवारांना जाब विचारला जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. स्थानिक नागरिकांकडून एमआयडीसी परिसरात प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे मात्र कामा संघटनेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.कामा असोसिएशनचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले, गेल्या काही वर्षांपासून एमआयडीसी परिसरातील प्रदूषण कमी झाले आहे. आता कारखानामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन यंत्रणा बसविले आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी झाल्याचे दिसून येईल. सांडपाण्यावर ही प्रक्रिया केली जाते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीकडून बिलामध्ये काही दर आकारले जातात. कारखानदार ते बिल भरत असतात. प्रत्येक कारखान्यांच्या बाहेर एक चेंबर देण्यात आले आहे. त्या कारखान्यातून येणारे सांडपाणी प्रक्रिया करून त्या चेंबरमध्ये सोडले जाते. चेंबरमधून सांडपाणी सीईटीपी र्पयत पोहोचविण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. सीईटीपी र्पयत पाणी जाताना सुविधा पुरविणो ही देखील एमआयडीसीची जबाबदारी आहे. पण आता चेंबर साठ वर्षापूर्वी होती तशीच आहे. कारखान्यांची संख्या वाढली इतर ही काही बदल झाले आहेत त्याअनुषंगाने सोयी सुविधा पुरविण्याची गरज होती.पण तसे घडले नाही. प्रदूषणाचे प्रमाण कमी होत असताना ही स्थानिक नागरिकांकडून आरोप केले जात आहे. यावरून कुणीतरी स्थानिक नागरिकांना हाताशी धरून कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप सोनी यांनी केला आहे.-----------------------------------------------------------