दै. मुंबई तरुण भारत आयोजित बिबट जनजागृतीपर नाट्यकृती
01-Mar-2024
Total Views |
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त मुंबईतील राणीच्या बागेत संगीत बिबट आख्यानाचे आयोजन.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): जागतिक वन्यजीव दिनाच्या औचित्त्यावर रविवार दि. ३ मार्च रोजी सीताई क्रिएश्न्स निर्मित संगीत बिबट आख्यान (sangeet bibat akhyan) या दीर्घांकाचे आयोजन केले आहे. दै. मुंबई तरुण भारतने बिबट जनजागृतीवर आधारित या संगीत नाटकाचे (sangeet bibat akhyan) आयोजन केले असून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय येथील हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील सभागृहामध्ये सकाळी साडेदहा वाजता ठेवण्यात आले आहे.
सीताई क्रिएश्न्स निर्मित, मकरंद सावंत लिखीत दिग्दर्शित संगीत बिबट आख्यान हे बिबट्याच्या शिकारी, अवयवांची तस्करी या विषयी जनजागृती करणारी एक संगीतमय नाट्यकृती (sangeet bibat akhyan) आहे. या दीर्घांकामध्ये मकरंद सावंत, तुषार घाडीगांवकर, सागर चव्हाण, श्रुती पाटील, वेदांत जाधव, तुलसी बोले, यश खाडे, अथर्व भेकरे, संस्कार लोहार आणि महेश कापरेकर या कलाकारांचा समावेश आहे. निर्माती कुणिका बनसोडे सावंत असून नाटकातील गीते मकरंद सावंत, प्रतिक चौधरी आणि आदित्य जावडेकर यांनी लिहीली आहेत. अथर्व भेकरे यांनी संगीत दिग्दर्शन केले असून संस्कार लोहार यांनी त्यांना सहाय्य केले आहे. वैष्णवी भालेकर यांनी नृत्य दिग्दर्शन तर गौरव सर्जेराव यांनी रेखाटनाचे काम केले आहे.
रविवार दि. ३ मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश ठेवला गेला असून Register here या लिंकवर नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. मानव बिबट संघर्ष आणि सहजीवन यावर भाष्य करणाऱ्या या नाट्यकृतीला उपस्थीत राहणं ही मनोरंजन आणि जनजागृतीची पर्वणीच ठरणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.