छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभात होणार शरीर सौष्ठव स्पर्धा!

09 Feb 2024 18:26:52
wrestling competition

मुंबई
: शिवकालीन खेळांचा वारसा, आपली संस्कृती जपण्यासाठी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी सदर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये येत्या ११ फेब्रुवारी पासून १३ फेब्रुवारी पर्यंत २ लक्षणीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कालावधी मध्ये ११ फेब्रुवारी रोजी शरीर सौष्ठव स्पर्धा आणि ११ ते १३ फेब्रुवारी या काळात मल्लयुध्दाचा पारंपरिक खेळ मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. शरीर सौष्ठव स्पर्धा ही अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा येथे दुपारी ३ वाजता आयोजित केले आहे. ह्या स्पर्धेमध्ये २०० पेक्षा स्पर्धक सहभागी होणार आहेत. तसेच मल्लयुध्दाचा पारंपरिक खेळ अंधेरी पूर्वेतील छत्रपती संभाजी महाराज नगर क्रीडांगण येथे सकाळी १० वाजेपासून सुरु होणार आहे. सदर क्रीडा स्पर्धांचा जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून नागरिकांनी फायदा उचलावा असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.


Powered By Sangraha 9.0