उत्तराखंडमध्ये भीषण हिंसाचार : कट्टरपंथींच्या गोळीबारात जखमी झाला अजय! देतोय मृत्यूशी झुंज!

09 Feb 2024 19:01:58

Ajay and her mom


हल्दवानी (वृत्तसंस्था)
: उत्तराखंडमध्ये रहाणारा अजय गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी आपल्या आईच्या औषधांसाठी बाजारात गेला होता. याच दरम्यान कट्टरपंथींनी केलेल्या दंगलीत तो जबर जखमी झाला असून तो मृत्यूशी झूंज देत आहे. उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात हल्दवानी शहरात हिंसाचार भडकल्याने निष्पाप अजयला हा त्रास भोगावा लागला. गुरुवारी घडलेला हा प्रकार सांगताना अजयची आई आणि भावाला अश्रू अनावर झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत त्याचे कुटूंबिय मदतीची याचना करत आहेत. अजयला कुठल्याही परिस्थितीत वाचवा, अशी मागणी सरकारतर्फे करण्यात येत आहे.
अजय जिममधून येत असताना आईची औषधे आणत होता. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान परिसरात अंधार पसरला होता. कुणी गोळ्या मारल्या ते समजले नाही. व्हायरल व्हीडिओत त्याचे आई आणि भाऊ सांगत आहेत की, "काहीही करा आणि आमच्या भावाला वाचवा. कमावता व्यक्ती असा असद्य होऊन पडल्याने किमान सरकारने आमच्या कुटूंबाला रेशन द्यावे", अशी आर्जव त्यांनी केली आहे. हल्ल्यानंतर सोशव मीडियावर अजयचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'ऑप इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित कुटूंब मुस्लिमबहुल गफूर बस्तीत राहते.
 गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी एका आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात गेली होती. (8 फेब्रुवारी) पीडित महिला आपल्या आजारी आईसाठी मुस्लिम व्यवसायिकाकडून आयुर्वेदिक औषध खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळीच गोळी त्याला गुप्तांगापासून काही भाग दूर लागली आणि मणक्यालाही मार लागला होता. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा पोलीस गोळीबार करत नव्हते. दंगेखोरांनी गोळ्यांचा वर्षाव केला, अशी माहिती अजयच्या काकांनी दिली आहे.
अजयवर रात्री ११ ते पहाटे ३.३० या दरम्यान शस्त्रक्रिया सुरू होती. त्याचे वय अंदाजे २२ ते २३ वर्षे आहे. उपचाराचा सर्व खर्च उत्तराखंड सरकार उचलणार आहे, अशी ग्वाही कुटूंबियांना देण्यात आली आहे. अजयचे नुकतेच लग्न झाले होते. तो भंगार विकण्याचे काम करायचा. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांचा शोध सुरू असून पोलीस कठोर कारवाई करत आहेत.
हल्दानीमध्ये नेमकं काय घडलं?

गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडच्या हल्दवानी भागात कट्टरपंथींनी जाळपोळ केली. बनभूलपुरा पोलिस ठाण्यात बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेल्या सरकारी जमिनीवर बांधलेला मदरसा पाडण्यात आला. यानंतर तेथील जमावाने पोलीसांवर आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. पोलीस ठाण्याला घेराव घातला बनभुळपुरा पोलीस ठाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांनाही आग लावली. जमावाने ट्रान्सफॉर्मरलाही आगीच्या भक्ष्यस्थानी नेल्याने वीजपुरवठाही खंडित झाला. बनभूलपुरा पोलीस ठाण्याला घेराव घातल्याने अनेक बराच काळ पत्रकार आणि प्रशासन अधिकारी पोलीस ठाण्यात अडकले होते. यावेळी एकूण चार जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जखमी असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ए.पी.अंशूमन यांनी सांगितले. दरम्यान या भागातील इंटरनेट सेवा, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.




Powered By Sangraha 9.0