'सामना'तुन मॉरीसचे उदात्तीकरण; उदय सामंतांनी दाखवली कात्रणे

09 Feb 2024 13:11:00

ok
 
मुंबई : अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने ८ फेब्रुवारीला गोळ्या झाडुन हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःला ही गोळ्या झाडुन आत्महत्या केली. यानंतर संजय राउत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. मॉरीस मुख्यमंत्र्यांना भेटला होता असा आरोप त्यांनी केला. याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिल आहे. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे अस त्यांनी म्हटल आहे.
 
हा गोळीबार उबाठा गटातल्या वादातुन झाला आहे. पुढील नगरसेवक कोण होणार याच्या वादातुन झाला आहे असा आरोपही उदय सामंत यांनी केला. कोणत्याही पक्षातला नेता किंवा कार्यकर्त्यांसोबत अस घडु नये हीच एकनाथ शिंदे आणि पुर्ण पक्षाची इच्छा आहे. आम्ही घोसाळकर कुटुंबीयांसोबत आहोत असही ते पुढे म्हणाले.
 
काही जण सतत एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आसतात. या प्रवृत्तीचा आणि या गोळीबाराचा आम्ही जाहीर निषेध करतो. असही ते म्हणाले. टिका करणाऱ्या आणि राष्ट्रपती राजवट लागू करा अस म्हणणाऱ्यांनी पालघर मध्ये साधुंची हत्या झाली त्यावेळी राष्ट्रपती राजवट लावली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
 

samna
 
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी सामना या वृत्तपत्रात प्रकाशित बातम्यांचे दाखले देत, मॉरीसच उदात्तीकरण कोण करत आहे ते पहा अस म्हटल आहे. यावेळी उदय सामंतांनी सामना मधुन मॉरीसचे समाजकार्याचे दाखले अनेकवेळा दिले गेल्याचही सांगितल.
 
दरम्यान, मॉरिस नरोन्हाने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर स्वतःवरही ४ गोळ्या झाडत आत्महत्या केली. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 'मॉरिसभाई' या नावाने ही व्यक्ती बोरिवली आणि दहिसर परिसरात ओळखली जायची. एका वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

Powered By Sangraha 9.0