पत्रकार निखिल वागळेंची गाडी फोडली! 'निर्भय बनो' कार्यक्रमातील घटना

09 Feb 2024 20:07:01
 nikhil wagle 
 
पुणे : पत्रकार निखिल वागळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी आणि राष्ट्रपती द्रौपती मूर्मूंविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात होणारी निर्भय बनो ची सभा होऊ देणार नाही, असा पवित्रा भाजपने घेतला होता. सभास्थळी भाजपच्या कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन सुरू होते. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलीसांकडे सभेला परवानगी नाकारावी, अशी मागणी केली होती. मात्र, वागळेंनी काहीही झालं तरी सभा होणारच, अशी भूमिका घेतली होती.
 
त्यानंतर आज ९ फेब्रुवारी ला संध्याकाळी पुण्यात पत्रकार निखील वागळे यांची गाडी फोडण्यात आली आहे. निर्भय बनो या कार्यक्रमाला पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यावेळी तेथील निखिल वागळे यांच्याविरोधात आक्रमक जमावेने त्यांच्या गाडीची तोडफोड केली.
 
पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार होता त्याला विरोध करत भाजप कार्यकर्तांनी विरोध केला. या नंतर पोलिसांनी आक्रमक जमावाला दुर केले व निखील वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. यानंतर तेथे उपस्थीत महाविकास आघडीच्या कार्यक्रत्यांनी आणि वागळे समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Powered By Sangraha 9.0