गुगल बार्डचे नवीन नामकरण. काय आहेत नवीन सुविधा वाचा…..

09 Feb 2024 12:31:31

gemini ai  
 
गुगल बार्डचे नवीन नामकरण. काय आहेत नवीन सुविधा वाचा.....
 

प्रति महिना ए आय सेवेसाठी १९५० रूपये सबस्क्रिप्शन किंमत असणार आहे.
 
 
मुंबई: गुगल बार्डचे नवीन नामकरण कंपनीकडून करण्यात आले आहे. गुगल ए चे गुगल जेमिनी हे नवीन नामकरण कंपनीकडून करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी कंपनीकडून सबस्क्रिप्शन सेवा पुरवण्यात येण्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 1950 रुपये प्रति महिना याप्रमाणे ही सुविधा कंपनीकडून देण्यात येईल. या व्यतिरिक्त कंपनी २ महिन्यांची ट्रायल सुविधा देखील देण्यात येईल. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुगीचा काळ सुरू असतानाच गुगलने आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बार्डचे नामांतर जेमिनी करून त्यात नवीन फिचर्स आणली आहेत.
 
विनामूल्य सुविधांसोबत काही खास सुविधा पेड ग्राहकांसाठी कंपनीकडून देण्यात येतील. गुगलच्या म्हणण्यानुसार, जेमिनी अल्ट्रा १.० हे मॉडेल विश्लेषण, कोडिंग, हस्तांतरण, एकत्रीकरण यां सुविधांसाठी अतिशय सक्षम असणार आहे. जेमिनी गुगल ए आय प्लॅन हा १९५० रूपये प्रति महिना निश्चित करण्यात आला आहे. या सुविधेमध्ये जीमेल, डॉक्स, स्लाईडस, शीट या सगळ्याच सुविधांचा अंतर्भाव केला जाणार आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून मायक्रोसॉफ्ट व गुगल यांच्यामधील कोल्ड वॉर सुरू असताना मध्यंतरी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी नवीन मायक्रोसॉफ्ट कोपायलट एक आयची घोषणा केली होती. याचं पार्श्वभूमीवर गुगलने आपले जेमिनी एक आय लाँच करत थेट नवीन आव्हान मायक्रोसॉफ्ट व प्रतिस्पर्ध्यांना दिले आहे.
 
हे सबस्क्रिप्शन गुगल वन मार्फत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0