हल्दवानी हिंसाचारामागे पीएफआय आणि बांगलादेशी घुसखोर?

09 Feb 2024 18:09:52
haldwani
 
देहराडुन : हल्दवानी हिंसाचारामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या भारतात प्रतिबंधीत असलेल्या संघटनेचा आणि बांगलादेशी घुसखोरांचा हात असू शकतो अशाी भिती भाजपचे राज्यसभा खासदार ब्रिजलाल यांनी व्यक्त केली आहे. ब्रिजलाल यांनी पुर्वी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणुनही काम पाहीले आहे.
 
ब्रिजलाल यांनी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचे समर्थन करत दंगेखोरांवर अशी कडक कारवाई करावी की त्यांना जामिनही मिळता कामा नये अशी मागणी केली आहे. 
 
उत्तराखंडच्या हल्दवानी मध्ये ८ फेब्रुवारी २०२४ ला कट्टरपंथी जमावाने अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिस आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक करत हल्ला केला. खासदार ब्रिजलाल म्हणतात, "ज्या पद्धतीने हा हिंसाचार घडवून आणला आहे त्यावरून तर तो पुर्वनियाजीत असल्याचे दिसते. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे." त्यातही दोषिंवर त्यांनी जामिनही मिळु नये अशी कलमे लावण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
दरम्यान, हल्दवानीमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी बनभुलपुरा येथे गेलेल्या अधिकाऱ्यांवर कट्टरपंथींकडुन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक पोलिस जखमी झाले. यावेळी कट्टरपंथीनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यामुळे हल्द्वानीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने पोलिसांना देंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.


Powered By Sangraha 9.0