छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्स यांना ' हा ' गौरवशाली पुरस्कार

09 Feb 2024 15:26:18

Tanuja Deshmukh
 
 
 
छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्स यांना ' हा ' गौरवशाली पुरस्कार


छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्स यांना वर्ष २०२४ चा ' मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार ' जाहीर
 

मुंबई: ' मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार २०२४' या कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्सची निवड करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विशेष
समारंभात तसेच सिनेक्षेत्रातील प्रथितयश अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते दिनांक १० फेब्रुवारीला टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
 
छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्स ही कंपनी गेली ११ वर्ष राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य विषयांतील योजना विविध रूग्णालयांमध्ये यशस्वीपणे राबविण्याचे काम करत आहेत. सध्या ही कंपनी एकूण ८ राज्यातील ५० विविध रूग्णालयांमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या या कामामार्फत त्यांनी आजवर ३ लाखांहून अधिक गरजू रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. तेराशे कोटींपेक्षा जास्त रक्कम रूग्णांच्या उपचाराकरिता मंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे.
 
या शिवाय कंपनीने विविध शासकीय विमा योजनेच्या माध्यमातून 1300 कोटी पेक्षा जास्त रक्कम रुग्णाच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिली आहे, तसेच 1200 कोटी पेक्षा जास्त विमान दाव्यांची रक्कम रुग्णालयाला मिळवून दिली. छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्सच्या तनुजा विकास देशमुख या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून हा पुरस्कार स्विकारतील.
 
Powered By Sangraha 9.0