डिसेंबर तिमाहीत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात बूम, ' भारतात आदरातिथ्याची लाट…..

09 Feb 2024 14:24:58

hospitality 
 
 
डिसेंबर तिमाहीत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात बूम, ' भारतात आदरातिथ्याची लाट.....
 
आदरातिथ्यात बंगलोर नंबर १, मुंबईत १६ टक्क्यांनी उलाढाल वाढली - हॉटेल मोमेंटम इंडिया अहवाल
 
मोहित सोमण
 

मुंबई: गेल्या तीन वर्षांत भारताचे पर्यटन सेवा व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या एकूण जीडीपी पैकी या क्षेत्राचे एकूण उत्पन्न १७८ अब्ज डॉलर्स होते. याशिवाय अयोध्येत राम मंदिरांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भारतात आध्यात्मिक पर्यटनाकडे वाढलेला कल पहायला मिळत आहे. याचं धर्तीवर हॉटेल मोमेंटम इंडिया या सर्व्ह निरिक्षणानुसार डिसेंबर तिमाहीत भारतातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात १५.८ टक्क्यांची वाढ झाली असण्याचे स्पष्ट केले आहे.
 
मागील डिसेंबर तिमाहीपेक्षा या तिमाहीत संपूर्ण भारतात १५.८ टक्के वाढ झाली आहे. या सर्व्हनुसार या तिमाहीत ८२ हॉटेलात ८७४१ चाव्या ग्राहकांना सुपूर्द करण्यात आल्या. अनेक हॉटेलचे ग्राहक काही १५ हॉटेलात परिवर्तित झाल्याचे सर्व्हेत सांगण्यात आले आहे.
 

हॉटेल मोमेंटम इंडिया ( एच एम आय) ची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -
 
१- इयर ऑन इयर बेसिसवर सरासरी दैनिक दर ( ए डी आर) हा २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये १४.६ टक्क्याने वाढले आहे.
२- रिपोर्टनुसार प्रति रूम उपलब्ध सदरात ३१ टक्के वाढ झाली आहे.
३- बंगलोर शहराने रेवपार वाढीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. बंगलोर मध्ये तब्बल ३१.९ टक्के हॉस्पिटॅलिटी सेवेसाठी मागणी वाढली आहे.
४- बंगलोर नंतर अनुक्रमे इयर ऑन इयर बेसिसवर दिल्ली ( २६.३%), हैद्राबाद ( २३.५ %) येथे झाली आहे.
५- मुंबई मध्ये हॉस्पिटॅलिटी सेवेसाठी सुमारे १६ टक्क्यांनी मागणी गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे.
 
एकूण वाढलेला पर्यटनाचा टक्का, वाढलेल्या पायाभूत सोयीसुविधा, सण समारंभ, विविध कार्यक्रम व इतर कारणास्तव पर्यटकांची मागणी वाढली आहे. भारतामध्ये एकूण जीडीपी मध्ये टूरिझम व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मोठी वाढ होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. सेवेंचा वाढलेला दर्जा, प्रादेशिक विविधता, विविध संस्कृती अशा विविध विषयांवर परदेशी पर्यटकांचा कल भारताकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे.
 
मोरोडोर इंटेलिजन्सचा आर्थिक वर्ष २०२३ च्या रिपोर्टनुसार, एकूण हॉस्पिटॅलिटी सेक्टरची आर्थिक उलाढाल २४.६१ अब्ज रुपये इतकी असू शकते. रिपोर्टनुसार ही उलाढाल २०२९ मध्ये ३१.०१ अब्ज होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत
 
Powered By Sangraha 9.0