श्रीराम-सीतेसंदर्भात आक्षेपार्ह स्टेटस ठेवणं भोवलं; गुन्हा दाखल!

08 Feb 2024 19:23:28

Police
पुणे : अयोध्येत श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यापासून श्रीराम व सीतामाता यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने करून हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रकरण ताजे असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये एकावर रामायणावरून आक्षेपार्ह स्टेटस ठेवून सामाजिक दुखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेत लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या राहुल वाघमारे नावाच्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी 'रावण राक्षस होता तर सीतेच्या स्वयंवरला त्याला आमंत्रण का? तो ब्राम्हण होता तर मग त्याची बहीण राक्षसी कशी? लोकांना वेड्यात काढणं सोपं असलं तरी त्यांना हे समजावणे मात्र कठीण आहे.', अशा आशयाचा एक स्टेटस ठेवला होता. तर दुसऱ्या स्टेट्समध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चेहऱ्याचे मॉर्फींग करून त्याठिकाणी दुसऱ्याचे चेहरे वापरून आक्षेपार्ह फोटो ठेवला होता. त्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी फिर्यादी धनंजय गावडे यांच्याकडून चिंचवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0