प्रदीप शर्मांच्या घरी आयकरचा छापा!

08 Feb 2024 16:55:47

Pradip Sharma


मुंबई : प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाने गुरुवारी छापा टाकला आहे. प्रदीप शर्मा हे मुंबईतील माजी पोलिस अधिकारी असून त्यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाते. एका आमदाराच्या प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
प्रदीप शर्मांच्या अंधेरी येथील निवासस्थानी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. मात्र, या कारवाईचं ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रदीप शर्मा हे अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असून याप्रकरणी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. दरम्यान, ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. त्यानंतर आता त्यांच्या घरी आयकर विभागाचा छापा पडल्याने चर्चांना उधाण आले आहे.



Powered By Sangraha 9.0