गुजरातमध्ये बुलडोझर बाबाची एंट्री! शोभायात्रेवर दगडफेक करणे भोवलं!

08 Feb 2024 12:55:59
 bulldozer
 
गांधीनगर : गुजरातमधील मेहसाणाच्या खेरालू येथील हटाडिया बाजार परिसरात बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. हा तोच भाग आहे जिथे दि. २१ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्री रामाच्या शोभा यात्रेत दगडफेक झाली होती. खेरालूच्या हातडिया मार्केट आणि जकातनाक्याजवळ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. हा तोच भाग आहेत जिथे प्रभू रामाच्या दर्शनावर कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली होती.
 
हतारिया येथील पंचमुखी हनुमान मंदिर ते बेलीम वाडा अशी एकूण ३०-३५ कच्ची अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसमध्ये जागेच्या मालकीचा पुरावा सादर करावा किंवा स्वतः अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. असे असतानाही अतिक्रमण हटविले जात नसल्याने प्रशासनाने बुलडोझरची कारवाई केली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशासनाने जारी केलेल्या नोटिशीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शहर सर्वेक्षण विभागाने दि. ५ फेब्रुवारी २०२४ सोमवारी सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणाच्या कामानंतर अखेर प्रशासनाने बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेत बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करून संपूर्ण बाजारपेठ अतिक्रमणमुक्त केली. यावेळी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0