"उद्धव ठाकरेंना मी एक कोटी रुपये दिले!", शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप

08 Feb 2024 15:22:21

Uddhav Thackeray


मुंबई :
उद्धव ठाकरेंना मंत्रिपदासाठी एक कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीपक केसरकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
दीपक केसरकर म्हणाले की, "मंत्रिपदासाठी त्यांनी जेवढे पैसे मागितले तेवढे माझ्याकडे नव्हते. राजकारणात पक्षाला पैसे लागत असतील तर आम्ही समजू शकतो. पण जे लोक स्वत:च पैसे घेत नाहीत त्यांच्याकडे पैसे मागितले तर आम्ही कुठून देऊ, आमच्या वडिलांची जागा विकल्यानंतर आम्ही पैसे देऊ. पण त्यावेळी देऊ न शकल्याने मंत्रिपद मिळू शकलं नाही. आम्हाला मंत्री करताना शिंदे साहेबांनी एक रुपयाही घेतला नाही. परंतू, पुर्वी जे आमचे नेते होते त्यांनी पैसे मागितले होते ही वस्तुस्थिती आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "मी चेक दिला असून तो दिल्याचा रेकॉर्ड असतो. मी एक कोटीचा चेक दिला आहे. आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले की. निवडणुकीसाठी हे मी सांगू शकत नाही. परंतू, माझे एक पत्रकार मित्र ज्यादिवशी आदित्य ठाकरेंना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरेंना कोकणातून कोण मंत्री असणार? असा प्रश्न विचारला. यावर आदित्य ठाकरेंनी दीपक केसरकरांशिवाय आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरे कोणते नाव नाही, असे उत्तर दिले होते. मात्र, त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही, असेही ते म्हणाले.






Powered By Sangraha 9.0