केजरीवालांना न्यायालयाचा दणका! 'या' प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे आदेश

08 Feb 2024 13:19:43
 kejriwal
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दि. ८ फेब्रुवारी २०२४ बुधवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टातून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांना दिल्ली दारु घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीसमोर दि. १७ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने दिल्ली न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
 
पाच वेळा समन्स पाठवूनही केजरीवाल चौकशीसाठी हजर झाले नसल्याची तक्रार ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या या अर्जावर न्यायालयाने बुधवारी दुपारी ४ वाजता निर्णय दिला. ईडीने दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना समन्स पाठवले होते.
 
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना पात वेळा समन्स पाठवले आहेत. केजरीवाल यांनी या पाच समन्सला प्रतिसाद दिला नाही आणि ते बेकायदेशीर असल्याचे सांगितले. केजरीवाल यांनी समन्सला उत्तर न दिल्याने अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आता न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0