कृष्णा नदीत आढळली भगवान विष्णूची मूर्ती! रामलला सारखं रूप, प्राचीन शिवलिंगही आढळलं!

07 Feb 2024 17:11:21
vishnu-idol-shivling-found-from-krishna-riverbed-in-karnataka

नवी दिल्ली :
  कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदी पात्रात भगवान विष्णूची मूर्ती सापडली असून सदर मूर्तीचे प्रारूप हे रामललासारखे असल्याचे समोर आले आहे. तसेच, भगवान विष्णूच्या मूर्तीसोबतच प्राचीन शिवलिंगही सापडले आहे. दरम्यान, इस्लामी आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी सदर मूर्ती कृष्णा नदीच्या पात्रात टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सदर विष्णूची मूर्ती इ. स. ११व्या शतकातील असल्याचे इतिहासकार पद्मजा देसाई यांनी सांगितले आहे. हे कल्याण चालुक्य राजवटीच्या काळात बांधले गेले. त्याभोवती विष्णूचा दशावतार चित्रित केलेला असून इस्लामिक आक्रमकांपासून सुरक्षित राहण्यासाठी ते नदीच्या पात्रात टाकण्यात आले असावे, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायचूर जिल्ह्यातील शक्ती नगरजवळ कृष्णा नदीवर पूल बांधण्यात येत असून येथील पुलाचे बांधकाम सुरू असताना नदीपात्रातून भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग सापडले. नदीच्या पात्रातून सापडलेल्या विष्णूच्या मूर्तीची तुलना अयोध्येच्या राम मंदिरात नुकत्याच झालेल्या रामललाच्या पुतळ्याशी केली जात आहे.

Powered By Sangraha 9.0