नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळाची ५१ वर्षे !

07 Feb 2024 14:36:34


nbt 
 
मुंबई : नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा (NDWBF), गेल्या 50 वर्षांपासून आयोजित केला जात आहे. हा साहित्य क्षेत्रातील एक महत्वाचा मानला गेलेला महोत्सव आहे. यावर्षी देखील दि. 10 ते 18 फेब्रुवारी २०२४ या काळात सकाळी 11.00 ते 08.00 दरम्यान पुस्तक मेळा संपन्न होईल. प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे नव्याने बांधलेल्या हॉल 1-5 मध्ये हा मेळा होणार आहे. या नवी दिल्ली वर्ल्ड बुक फेअर (NDWBF) 2024 मध्ये सौदी अरेबियाचे राज्य सन्माननीय देश म्हणून गौरविले जाईल. दरवर्षी नॅशनल बुक ट्रस्ट, भारत (भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत) या मेळ्याचे आयोजन केले जाते. तर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय) हे या मेळ्याचे सह-आयोजक व स्थळ भागीदार आहेत.
 
NDWBF हा केवळ एक कार्यक्रम नाही तर साहित्य, संस्कृती, कला आणि ज्ञानाचा उत्सव आहे. नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सर्व साहित्य रसिकांना या मेळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0