समान नागरी कायदा आला तरीही आम्ही चार निकाह करणारच!

07 Feb 2024 15:34:14
muslims-oppose-ucc-law-in-uttarakhand

नवी दिल्ली : 
'समान नागरी कायदा आला तरीही आम्ही चार निकाह करु', अशी गरळ देहरादून शहर काजींनी यूसीसीच्या निषेधार्थ ओकली. ते म्हणाले, आम्ही फक्त शरियतचे पालन करू, तसेच यूसीसीच्या निषेधार्थ मुस्लिम समाज रस्त्यावर उतरणार असेही शहर काजी यावेळी म्हणाले. दरम्यान, उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा(यूसीसी) विधेयक सादर करण्यात आले आहे.

उत्तराखंड देशातील पहिले राज्य ठरणार असून यूसीसी विधेयक लागू करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या घडीला विधानसभेत विधेयक सादर करून त्यावर चर्चा सुरू आहे. तसेच, राज्यातील सर्व नागरिकांसाठी समान कायद्याचा आधार बनलेल्या या यूसीसी कायद्याला मुस्लिम समाजाकडून सतत विरोध करण्यात येत असून समाजाकडून यूसीसीविरुध्द तर्कहीन युक्तिवाद केले जात आहेत.

अनेक मुस्लिम नेते शरियतला राज्यघटनेत ठेवण्याबाबत बोलत असून यासंदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका मुस्लिम तरुणाचा तर्क असा आहे की, “आम्हाला शरियत कायद्यानुसार अनेक विवाह करण्याची मुभा आहे. त्यामुळे आम्हाला शरियत कायदा हवा आहे त्यामुळे आम्ही यूसीसी विरोध करत आहोत, असे त्याचे म्हणणे आहे.

Powered By Sangraha 9.0