न्यायाधीश व्हीजी श्रीदेवी यांच्या हत्येला प्रवृत्त करणाऱ्यास अटक; वाचा नेमकं प्रकरण काय?

07 Feb 2024 16:44:36
kerala-judge-sridevi-who-pronounced-death-arrested

नवी दिल्ली :
न्यायाधीश व्हीजी श्रीदेवी यांच्या हत्येला प्रवृत्त करणाऱ्यास केरळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश श्रीदेवी यांच्या हत्येला प्रवृत्त करणारा मुहम्मद हादी याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश श्रीदेवी हे इस्लामिक कट्टरतावादी यांच्या निशाण्यावर आले होते.

२६ वर्षीय इस्लामिक कट्टरतावादी मुहम्मद हादी याला पेरूवन्नामुझी पोलिसांनी पेरामपारा येथून अटक केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून महिला न्यायाधीशाच्या हत्येची बाजू मांडली होती. पोलिसांनी त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणाहून अटक केली असून पोलिसांनी स्वतः याप्रकरणी दखल घेत त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

दरम्यान, महिला न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी तीन कट्टरपंथीयांना यापूर्वीच अटक केली असून नासिर मोन, नवाज नैना आणि रफी अशी त्यांची नावे आहेत. सदर प्रकरणानंतर केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायाधीश श्रीदेवी यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती.

एकंदरीत, बंदी घातलेली इस्लामिक दहशतवादी संघटना पीएफआय आणि संबंधित राजकीय संघटना एसडीपीआयच्या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा दिल्यानंतर महिला न्यायाधीश कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. या दहशतवाद्यांना भाजप नेते रणजित श्रीनिवास यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0