मुस्लिमांचे पूर्वजही सनातनी होते: योगी आदित्यनाथ

07 Feb 2024 18:01:37
Yogi Adityanath on Muslim

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज उत्तर प्रदेश विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री योगी म्हणाले की,विकसित भारत ही माझी वचनबद्धता आहे. यादरम्यान त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आणि राम मंदिराबाबत त्यांनी विरोधकांची कोंडी केली. राम मंदिराच्या उभारणीने सर्वजण आनंदी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, मात्र शतकातील सर्वात मोठ्या घटनेवर विरोधक काहीच बोलले नाहीत, अशी टीका ही योगी आदित्यनाथ यांनी केली.

तसेच योगी आदित्यनाथ म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीने प्रत्येक सनातनी आनंदी आहे, मुस्लिमांचे पूर्वजही सनातनी होते. मात्र शतकातील सर्वात मोठ्या घटनेवर विरोधक काहीही बोलले नाहीत.पण राम मंदिर आधी बांधायला हवे होते. आज प्रत्येक व्यक्ती नवीन, दिव्य आणि भव्य अयोध्या पाहून भारावून गेली आहे. हे काम फार पूर्वी व्हायला हवे होते. अयोध्येतील लोकांसाठी विजेची व्यवस्था करता आली असती आणि तेथे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता आल्या असत्या. कोणत्या हेतूने ही विकासकामे थांबवली गेली? जर मी अयोध्या आणि काशीला गेलो आहे, तर मी नोएडा आणि बिजनौरलाही गेलो आहे, असे वाटते.



Powered By Sangraha 9.0