"समान नागरी कायद्याला कचराकुंडीत टाका" - 'या' मुस्लिम नेत्याचे वादग्रस्त विधान

07 Feb 2024 11:56:19
 UCC
 
दिसपूर : "समान नागरी कायदा निसर्ग नियमांच्याविरुद्ध आहे. तो जास्त काळ टिकणार नाही. या कायद्याला कचरा कुंडीत टाकायला पाहिजे. देवाने महिलांना आणि पुरुषांना समानच अधिकार द्यायचे असते तर त्याने स्त्रिया बनवल्या नसत्या. त्याने सगळे पुरुषच बनवले असते." असे वादग्रस्त विधान एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी केले आहे. उत्तराखंडच्या विधानसभेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी कायदा विधेयक सादर केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या सरकारने दि. ६ फेब्रुवारी २०२४ ला समान नागरी कायदा विधानसभेत सादर केला आहे. या कायद्याच्या मसुद्यानुसार, लग्न, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक, पोटगी यासंबंधीचे सर्व नियम कोणत्याही धर्माचा विचार न करता सर्वांना समान असतील. हा कायदा मंजूर झाल्यानंतर ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व यासारख्या अनिष्ट प्रथा नष्ट होतील. तरीही विरोधी पक्षातील नेते या कायद्याला विरोध करत आहेत.
 
एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल याआधी सुद्धा अनेक वादग्रस्त विधान केले आहेत. ते आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा देण्याचा पण आरोप केला जातो.
 
 
Powered By Sangraha 9.0