शरद पवार गटाचे नाव आणि चिन्ह काय असेल? 'हे' पर्याय आले समोर

07 Feb 2024 11:49:51

Sharad Pawar


मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने मंगळवारी महत्त्वपुर्ण निर्णय दिला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचे निवडणुक आयोगाने म्हटले आहे. याशिवाय, पक्षाचे नाव आणि 'घड्याळ' हे चिन्हसुद्धा अजित पवारांना दिले आहे. दरम्यान, आता शरद पवार गटाचे नाव आणि चिन्हाबाबत काही पर्याय पुढे आले आहेत.
 
निवडणून आयोगाने शरद पवार गटासाठी बुधवारी दुपारपर्यंत नावं आणि चिन्ह सुचविण्यास सांगितले आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाकडून याबाबत चाचपणी सुरु असून चार नावे आणि चिन्ह पुढे आले आहेत. शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष असे पर्याय पक्षाच्या नावाकरिता देण्यात आले आहेत. तसेच कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य हे चार पर्याय पक्षचिन्हासाठी देण्यात आले आहेत. यापैकी कुठलेही एक नाव आणि पक्षचिन्ह निश्चित केले जाणार आहे. दुसरीकडे, निवडणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.





Powered By Sangraha 9.0