विकसित भारताच्या निर्माणासाठी सर्वांनी योगदान द्यावे! नितेश राणेंचे आवाहन

कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघात "गाव चलो अभियान"

    07-Feb-2024
Total Views |

Rane


सिंधुदुर्ग :
भाजपकडून सध्या राज्यभरात 'गाव चलो अभियान' राबवण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे अभियान राबवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघांमध्ये भेट देत मोदी सरकारच्या योजनांची माहिती जनतेला दिली.
 
गाव चलो अभियानाअंतर्गत नितेश राणेंनी कणकवली तालुक्यातील फोंडा विभागात घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संपर्क साधला. मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेला दिली. तसेच राबविल्या. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विकसित भारताच्या निर्माणासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.