दादांची 'सुप्रीम' तयारी! कोर्टात दाखल केली कॅव्हेट

07 Feb 2024 18:20:07

Sharad Pawar & Ajit Pawar


नवी दिल्ली :
निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. मात्र, त्याआधीच अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायायलाय कॅव्हेट दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा याबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरु होती. दरम्यान, निवडणुक आयोगाने मंगळवारी याबाबत निर्णय देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना देत तोच खरा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. परंतू, त्याआधीच अजित पवार गटाने न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे. याप्रकरणात आमचं म्हणणंसुद्धा ऐकुन घ्यावं अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे.
 
कॅव्हेट म्हणजे काय?
 
कॅव्हेट म्हणजे न्यायालयाला देण्यात आलेली एक कायदेशीर नोटीस असते. याचा अर्थ इशारा किंवा सावधानपत्र असा होतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या किंवा दाखल होणाऱ्या दाव्याची पूर्वसूचना देण्यात यावी, याशिवाय त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने कोणताही एकतर्फा हुकूम देऊ नये, याकरिता करण्यात आलेला अर्ज म्हणजे कॅव्हेट होय.





Powered By Sangraha 9.0