एक हजार वर्षांनी सापडली, 'रामलला'सारखी मूर्ती!

07 Feb 2024 18:55:52
Ancient Vishnu idol similar to Ram Lalla

नवी दिल्ली : कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीत भगवान विष्णूची मूर्ती सापडली आहे. भगवान विष्णूची ही मूर्ती सुमारे एक हजार वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे ही मूर्ती अगदी रामललाच्या राममंदिराशी मिळती जुळती आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, ही मूर्ती ११व्या किंवा १२व्या शतकातील असू शकते.दि.२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

Shivlinga


दरम्यान या भगवान विष्णूच्या मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंगही सापडले आहे. भगवान विष्णूच्या या मूर्तीचे स्वरूप आणि रूप हे अयोध्येतील रामललाच्या भव्य आणि दिव्य मंदिरात स्थापित केलेल्या मूर्तीसारखे आहे.भगवान विष्णूच्या या मूर्तीच्या प्रभामंडलाभोवती ‘दशावतार’ कोरलेले आहेत. मूर्ती मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी यांची मूर्ती दिसते. तसेच भगवान विष्णूच्या मूर्तीला चार हात आहेत, त्यापैकी दोन हात शंख आणि चक्राने सुसज्ज आहेत. दोन हात सरळ खाली आशीर्वादाच्या मुद्रेत आहेत. यातील एक ‘कटी हस्त’ आणि दुसरे ‘वरद हस्त’ आहे.ही मूर्ती एखाद्या मंदिराच्या गर्भगृहाचा भाग असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. मंदिराच्या तोडफोडीपासून वाचवण्यासाठी नदीत विसर्जित केल्याची शक्यता आहे.या मूर्तीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात मूर्तीच्या नाकाला किंचित इजा झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0