देशात सोयाबीन तेलाच्या विक्रीत वाढ; पाम तेल आयातीत १२ टक्क्यांनी घट

06 Feb 2024 16:59:37
palm-oil-indias-palm-oil-low-soy-oil-sales-rise
 
नवी दिल्ली : भारताची पामतेल आयात जानेवारीमध्ये तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. या काळात पामतेलाच्या तुलनेत सोया तेलाची विक्री वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, जानेवारीत पाम तेल आयात १२ टक्क्यांनी घसरून ७ लाख ८७ हजार टनांपर्यंतच झाली आहे.

दरम्यान, ऑईल रिफायनर्सनी पाम तेलाच्या प्रतिस्पर्धी सोया तेलाची अधिक विक्री सुरू केली आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या मते, याचे कारण म्हणजे कच्च्या पाम तेलाच्या शुद्धीकरणात बरीच तफावत आढळून आली आहे. तसेच, जगातील सर्वात मोठ्या खाद्यतेल आयातदार देश इंडोनेशिया आणि मलेशिया या प्रमुख देशांमधील पाम तेलाचा साठा वाढू शकतो, असेदेखील डीलर्सकडून सांगण्यात आले.

जानेवारी महिन्यात आयात मागील महिन्याच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घसरून ७ लाख ८७ हजार टनापर्यंत आली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत कच्च्या पाम तेलाची आयात १६ टक्क्यांनी घसरून ५ लाख ४१ हजार टनांवर आली यामुळे पाम तेलाच्या आयातीवर प्रामुख्याने परिणाम झाला आहे.

Powered By Sangraha 9.0