'आमचा पक्ष आणि चिन्ह शरद गोविंदराव पवार' मोहिमेस सुरुवात!

06 Feb 2024 21:34:27
nationalist congress party News


मुंबई
: दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचा असल्याचे आयोगाने सांगितले. त्यानंतर शरद पवार गटाने एक नवी मोहिम हाती घेतली आहे.त्या मोहिमेचे नाव आहे, 'आमचा पक्ष आणि चिन्ह शरद गोविंदराव पवार' असे आहे.



दरम्यान आमच्या वकीलांनी उत्तमपणे बाजू मांडली. तरी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय धक्कादायक आहे. पण २३ राज्यातील राष्ट्रवादी शरद पवारांच्या बाजूने आहे. तसेच सर्वाधिक पदाधिकारी शरद पवारांकडे असल्याचे पाटलांनी सांगितले. तसेच फक्त आमदारांच्या संख्येवरून निवडणूक आयोगानं निर्णय दिला आहे. आमच्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, सुप्रीम कोर्ट न्याय देईल. तसेच याप्रकरणाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणूकीच्या आधी न्याय मिळेल,अशी अपेक्षा असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0