राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत मुंबईच्या आयुष फाळकेची चमकदार कामगिरी

06 Feb 2024 21:47:33
State Level Judo Competition

मुंबई :  
महाराष्ट्र जुडो संघटनेतर्फे आयोजित केलेल्या व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या दरम्यान नागपूर जुडो संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सर्व खेळाडूंना त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत विविध वजनी गटात 1150 खेळाडूंचा सहभाग होता. माणकापूर विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या या सुवर्ण महोत्सवी जुडो स्पर्धेत -73 किलो वजनी गटात मुंबईचा आयुष फाळके हिरो ठरला त्याने आपल्या गटात नागपूर, सातारा, अमरावती, सोलापूर ,जालना अशा अनेक दिग्गज खेळाडूंना धूळ चारली आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
 
तसेच सिनियर ग्रुप मध्ये खेळून त्याने त्याच स्पर्धेत कांस्यपदक देखील मिळविले. आयुष हा खालसा महाविद्यालयात. बी.एम.एस. शिकत असून दादरच्या समर्थ व्यायाम मंदिर आणि पोद्दार जुडो क्लब मध्ये आंतरराष्ट्रीय जुडो पटू रविन्द्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सराव करीत आहे आयुष ला उत्कृष्ट स्विफ्ट मारल्या बद्दलचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच सब ज्युनिअर-48 किलो वजन गटात याशिका आसावल्ले हिने सुवर्ण पदकाची कमाई केली.
 
संपदा फाळके -78 किलो गटात रौप्य पदक, शंभवि कदम +78 सिनियर गटात रौप्य पदक, भूमी कोरडे -70 किलो ज्युनिअर गटात रौप्य पदक, आर्या पाटील - 57 किलो वजन कॅडेट गटात रौप्य पदक, जय थापा -81 कॅडेट गटात रौप्य पदक आणि आयुष फाळके-73 किलो सिनियर गटात कांस्यपदक, खुशी धानानि-28 सब ज्युनिअर गटात कांस्यपदक, जिना कोटक -57 किलो सब ज्युनिअर गटात कांस्यपदक मिळवून समाधान मानावे लागले.
 
या स्पर्धेत महाराष्ट्र जुडो संघटनेचे सचिव शैलेश टिळक, अध्यक्ष अँड. धनंजय भोसले, आयोजन सचिव पुरुषोत्तम चौधरी, तांत्रिक सचिव दत्ता आफळे, रविन्द्र पाटील, नागपूर जुडो चे डांगे सर, मांडोकर यांनी सुवर्ण महोत्सवी जुडो स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. शेवटी या स्पर्धेचा समारोप माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला सर्व विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.
Powered By Sangraha 9.0