मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल आठवडाभरात; ९५ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

06 Feb 2024 17:46:44
State Commission for Backward Classes Survey

मुंबई :
मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने सुरू केलेल्या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, ९५ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या माध्यमातून तब्बल १ हजार जीबीचा डेटा संकलित झाला आहे.

२३ जानेवारी २०२४ पासून राज्य मागासवर्ग आयोगाने गोखले इनस्टिट्यूटच्या सहकार्याने हे काम हाती घेतले होते. या सर्वेक्षणात एकूण २ कोटी ४८ लाख २४ हजार १५१ कुटुंबांचे सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १ हजार जीबीचा डेटा संकलित झाला.

त्याचे विश्लेषण केल्यावर आठवड्याभराने गोखले इनस्टिट्यूट मागासवर्ग आयोगाला मराठा सर्वेक्षणासंबंधीचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. या सर्वेक्षणातून मराठा समाजाची एकूण लोकसंख्या, तसेच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती समजण्यास मदत होणार आहे.
Powered By Sangraha 9.0