मालेगावचा मिनी पाकिस्तान उल्लेख, नितेश राणेंना नोटीस! म्हणाले, "अशा कितीही नोटीसा..."

06 Feb 2024 14:34:50

Nitesh Rane


मुंबई :
महाराष्ट्रात राहून जर कुणी पाकिस्तानचा उदो उदो करत असेल तर कितीही नोटीस पाठवल्या तरी यावर आम्ही बोलणार आहोत, असे प्रत्युत्तर भाजप आमदार नितेश राणेंनी दिले आहे. नितेश राणेंनी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केल्याने माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यांना नोटीस पाठवली होती. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, मालेगावचा उल्लेख मी मिनी पाकिस्तान असा केल्याने अनेक लोकांना हिरव्या मिरच्या झोंबल्या. त्यामुळे सतत माझ्या नावाने पत्रकार परिषद घेणे आणि नोटीसा पाठवण्याचं काम सुरु आहे. मालेगाव हा महाष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रातील अनेक लोक तिथे राहतात. त्यामुळे महाराष्ट्रात राहून जर कुणी पाकिस्तानचा उदो उदो करत असेल तर यावर आम्ही आजही बोलणार आणि उद्याही बोलणार आहोत. कितीही नोटीस पाठवल्या तरी यावर आम्ही बोलणार आहोत."
 
यावेळी त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणांचा एक व्हिडीओही पाठवला. ते म्हणाले की, "पाकिस्तान जिंदाबादचे नारे जर महाराष्ट्रातल्या एका शहरात ऐकायला मिळत असतील आणि त्यावर काही बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवादात बसत नाही. त्यामुळे आम्ही याचं उत्तर देऊ," असेही ते म्हणाले.
 
"मालेगाव शहरामध्ये ३०० कोटीपेक्षा जास्त वीज चोरी होण्याचं सत्य मी मांडलेलं होतं. यासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली असल्याचेही तेव्हा सांगिलते होते. त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहेत. काही अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून त्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची दुरुस्ती होण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणत यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले."
  
Powered By Sangraha 9.0