मुंब्रामध्ये 'सय्यद'चा विषारी फुत्कारा!

06 Feb 2024 21:03:10

Sayyed Shabahat Hussain
(Mumbra Sayyed Hate Speech)

मुंब्रा : इस्लामी उपदेशक मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यास गुजरात एटीएसने हिंदुविरोधी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी रविवारी मुंबईतून ट्रान्झिस्ट रिमांडवर ताब्यात घेतले होते. याप्रकरणी सोमवार, दि. ०५ फ्रेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता अलमास कॉलनी, मुंब्रा येथे आयोजित 'गरीब नवाज परिषदे'त सय्यद शबाहत हुसेन या इस्लामी उपदेशकाने येथील मुस्लिमांना जाहीरपणे भडकवण्याचा व त्यांना आत्मघाती हल्ल्यासाठी प्रवृत्त केल्याचेही समोर आले आहे.
गरीब नवाज परिषदेचे थेट प्रक्षेपण अहलेसुन्नत नेटवर्क (Ahlesunnat Network) या युट्युब पेजवर सोमवारी करण्यात आले होते. 'मौलाना अजहरीने केलेल्या भाषणात काहीच चुकीचे नाही, सरकारने केलेली कारवाई चुकीची आहे, मौलाना अजहरीला मुक्त करा', अशी मागणी यावेळी सय्यद हुसेन याने केली असली तरी 'सरकारविरोधात आत्मघाती हल्ल्यासाठी तयार व्हा' अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या जाहीर भाषणातून केला आहे. 'हुजूर के नाम पे कौन कौन गर्दन कटा सकता है?, जो कटा सकते है वो कुछ भी कर सकते है! बरेलवी मुसलमान मौलाना अजहरी के साथ है', अशा प्रकारची विधाने त्यावेळी सय्यदकडून करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनीही 'नारा-ए-तकबीर'च्या घोषणा देत त्यांच्या विधानास समर्थन दिल्याचे दिसले.


Powered By Sangraha 9.0