धारावी पुनर्वसन प्रकल्प! पात्र-अपात्र लोकांचं सर्वेक्षण सुरू होणार; सोमय्यांची माहिती
06 Feb 2024 11:51:20
मुंबई : बहुचर्चित असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र-अपात्र लोकांचे सर्वेक्षण आता सुरू होत असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, "धारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र परीवारांना धारावीमध्येच घरं मिळणार आहेत. तर अपात्र परिवारांचे देखील पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुंबईमधील १ डझन जागांची, जमिनींची चाचपणी सुरू केली आहे. यातील काही जमिनी केंद्र सरकार, राज्यसरकार, मुंबई महापालिका, मीठागर तर काही रेल्वेच्या आहेत," अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय एका ठिकाणी ५ ते १० हजार परिवारांचे पुनर्वसन व्हावं. सगळ्याचं पुनर्वसन व्हावं, अशी विनंती राज्य सरकारकडे केली असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.