२३ राज्यातील राष्ट्रवादी शरद पवारांच्या बाजूने : जयंत पाटील

06 Feb 2024 20:46:08
Jayant Patil on sharad pawar

मुंबई : आमच्या वकीलांनी उत्तमपणे बाजू मांडली. तरी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय धक्कादायक आहे. पण २३ राज्यातील राष्ट्रवादी शरद पवारांच्या बाजूने आहे. तसेच सर्वाधिक पदाधिकारी शरद पवारांकडे असल्याचे पाटलांनी सांगितले. २ जुलै २०२३ अजित पवारांनी आपल्याच काकांविरुध्दचा बंडाचं रणशिंग फुकंलं. आणि अजित पवार आपल्या ९ आमदारांसह फडणवीस- शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचा असल्याचे आयोगाने सांगितले.

त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, फक्त आमदारांच्या संख्येवरून निवडणूक आयोगानं निर्णय दिला आहे. आमच्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, सुप्रीम कोर्ट न्याय देईल. तसेच याप्रकरणाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणूकीच्या आधी न्याय मिळेल,अशी अपेक्षा असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले.

तर दुसरीकडे अजित पवार गटाने ट्विट करत 'आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!' असे म्हणटले आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतरच अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

 

 
Powered By Sangraha 9.0