ह्युंडाई मोटर्सचा आयपीओ येणार!; आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता

06 Feb 2024 16:28:47
Hyundai Motors india limited ipo

मुंबई :
दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी ह्युंडाई या वर्षाच्या अखेरीस सार्वजनिक प्रारंभिक ऑफर 'आयपीओ'द्वारे ३ अब्ज म्हणजेच सुमारे २५ हजार कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. दरम्यान, ह्युंडाई कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाल्यास लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या २१ हजार कोटी रुपयांच्या शेअर विक्रीला मागे टाकून भारतातील सर्वात मोठी कंपनी असेल. त्याचबरोबर, कंपनीच्या आयपीओमुळे टेस्लाच्या भारतातील भविष्यातील ईव्ही विक्रीला धक्का बसण्याची क्षमता असल्याचे बोलले जात आहे.

प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून ह्युंडाई कंपनी या वर्षाच्या अखेरीस आयपीओद्वारे किमान ३ अब्ज रुपये उभारण्याचा विचार कंपनी करत आहे, सूत्रांनी सांगितले की, मारुती सुझुकी इंडिया लि. नंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माती कंपनी असलेल्या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड ३ ते ५.५ अब्ज डॉलर्सच्या श्रेणीत निधी उभारण्यासाठी १५ ते २० टक्के स्टेक स्टेक कमी करण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

अपेक्स सोलर कंपनीचा आयपीओ येणार 

सोलर उर्जा प्रदान करणाऱ्या अपेक्स सोलर कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून ७५ कोटी रुपये उभारले जाणार आहेत. या आयपीओकरिता १०९-११०५ रुपये प्रति शेअर मूल्यदर ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा आयपीओ येत्या ०८ ते १२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खुला होणार आहे. बडे गुंतवणूकदार ०७ फेब्रुवारीला बोली लावतील.
Powered By Sangraha 9.0