"गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडायला हवं"

06 Feb 2024 12:57:46
 gandhi family
 
जयपूर : "काँग्रेस पक्षामध्ये गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्या नेत्यांना संधी मिळायला हवी, माझे वडिल(प्रणव मुखर्जी) हे आज हयात असते. तर त्यांना काँग्रेसची ही दुरावस्था पाहून त्रास झाला असता." असं वक्तव्य भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची मुलगी शर्मिष्ठा यांनी केले आहे.
 
शर्मिष्ठा मुखर्जींने हे वक्तव्य जयपूरमध्ये आयोजित जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल या कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, "यूपीए सरकारच्या काळात प्रणव मुखर्जींनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कमजोर सरकार चालवण्यापेक्षा विरोधी पक्षात बसणे चांगले, असे सांगितले होते."
 
शर्मिष्ठा मुखर्जींनी यावेळी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सुद्धा कौतुक केले. ते म्हणाल्या की, "मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांना भारतरत्न मिळायला हवा. माझ्या वडिलांनी त्यांचा खूप आदर केला."
 
 
Powered By Sangraha 9.0