राज ठाकरेंना मिळाली बाबरीची वीट! मनसे नेत्याची अनोखी भेट

06 Feb 2024 15:12:39

Raj Thackeray


मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबरी मशीदीची एक वीट भेट म्हणून मिळाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी त्यांना ही अनोखी भेट दिली. यावेळी राज ठाकरेंनी राम मंदिराचीही विटही संग्रही ठेवायची असल्याचे म्हटले आहे.
 
बाबरीची विट भेट म्हणून स्विकारल्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "६ डिसेंबर १९९२ ला जेव्हा बाबरीचा ढाँचा पडला त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते त्यात बाळा नांदगावकर होते. तो ढाँचा पडल्यानंतर तिथल्या विटांपैकी एक विट बाळा नांदगावकर घेऊन आले होते. त्यांच्याकडे दोन विटा होत्या. एक त्यांच्याकडे आहे आणि दुसरी त्यांनी भेट दिली. या विटेचं वजन बघितलं तर लक्षात येईल की, त्यावेळीचं बांधकाम किती चांगलं होतं. तेव्हाची बांधकामं चांगली होती कारण तेव्हा टेंडर निघायचे नाही," अशी टिपण्णीही त्यांनी केली.
 
ते पुढे म्हणाले की, "हा ढाँचा पाडल्याचा पुरावा आहे. आता राम मंदिर ज्या विटांपासून बांधलं जात आहे त्यातलीसुद्घा एक विट आणायची आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता," असेही राज ठाकरे म्हणाले.



Powered By Sangraha 9.0