उत्तर प्रदेश राज्याच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठा अर्थसंकल्प!

05 Feb 2024 18:17:30
uttar pradesh budget 2024


नवी दिल्ली
: उत्तर प्रदेशच्या विकासासाठी अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी सोमवारी विधानसभेत राज्याचा ७.३६ लाख कोटी रुपयांहून अधिकचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांपासून पर्यटनापर्यंत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय २४ हजार कोटी रुपयांच्या नवीन योजनांचाही समावेश करण्यात आला आहे.
आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्या राज्याचा कारभार रामराज्याने प्रेरित आहे. उत्तर प्रदेश सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. भविष्यात ऊर्जा क्षेत्रातही राज्याची प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्य सरकारने हिरो फ्युचर एनर्जीसोबत 4 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत संस्थेने राज्यात अक्षय ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे.

या आहेत महत्त्वाच्या तरतूदी
 
· गंगा एक्सप्रेस वे प्रकल्पासाठी 2057 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

· 2025 च्या महाकुंभ मेळ्यासाठी 2500 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

· अयोध्येच्या विकासासाठी 100 कोटी रुपये.

· शहरी झोपडपट्ट्यांसाठी 675 कोटी रुपयांची तरतूद केली.

· वेगवान आर्थिक विकासासाठी 2400 कोटी रु.

· ग्रामीण भागात पूल बांधण्यासाठी 1500 कोटी रुपये.

 
· महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 150 कोटी रुपये.

· जेवर, गौतम बुद्ध नगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामासाठी 1150 कोटी रुपये.

· वाराणसीमध्ये एनआयएफटी स्थापन करण्यासाठी 150 कोटी रुपये.

· लखनौ-हरदोई येथील पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल आणि ॲपेरल पार्कसाठी 200 कोटी रुपये.

· कान्हा गोशाळा आणि निराधार पशु योजनेसाठी 400 कोटी रुपये.

· राज्यातील धर्मादाय रस्त्यांच्या विकासासाठी रु. 1750 कोटी.

· कानपूर मेट्रोसाठी 395 कोटी रु.

· आग्रा मेट्रोसाठी 346 कोटी रु.

· दिल्लीच्या धर्तीवर लखनऊमध्ये एरोसिटी विकसित करण्यासाठी 1500 कोटी रुपये.
 
· सवलतीच्या दरात वीज पुरवठ्यासाठी 4 हजार कोटी.

· रस्ते बांधणीसाठी 2500 कोटी रु.

· अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राशी संबंधित तीन नवीन योजना राबवण्यासाठी 460 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याचा अर्थसंकल्प श्रीरामास अर्पण केला. ते म्हणाले की आम्ही हा अर्थसंकल्प श्री राम लल्ला यांना देऊ करतो. या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला, मध्यभागी आणि शेवटी प्रत्येक गोष्टीत भगवान श्रीराम उपस्थित आहेत. त्याच्या विचारात, संकल्पात आणि प्रत्येक शब्दात श्रीराम आहे. रामराज्य संकल्पनेअंतर्गत अर्थसंकल्पात प्रत्येक विभागाच्या विकासावर भर देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.




Powered By Sangraha 9.0