टॅक्स सेव्हर फंड निवडताय?, तर मग हे एकदा जाणून घ्या

05 Feb 2024 19:50:11
equity-linked-savings-schemes

मुंबई :
सध्या कर बचतीचा हंगाम सुरू असून अशा वेळेस गुंतवणूकदार टॅक्स सेव्हर फंड निवडताना दिसून येतात. परंतु, अलीकडील कामगिरीवर आधारित टॅक्स सेव्हर फंड निवडणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. अनेक गुंतवणूकदारांना इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ईएलएसएस) गुंतवणूक करायची असेल, त्यांना अलीकडच्या काळात मिळालेला उच्च परतावा मिळत असला तरी ४२ फंडांसह योग्य फंड निवडणे सोपे नसल्याचे बोलले जाते.

दरम्यान, उच्च परतावा मिळवून देणाऱ्या ईएलएसएस सारख्या फंडांबाबत कलम ८०सी अंतर्गत कपातीसाठी पात्र असलेल्या छोट्या लॉक-इन कर-बचत उत्पादनांमध्ये किमान पाच वर्षांचा लॉक-इन असतो आणि ते निश्चित-उत्पन्न देणारे असतात. दोन्हींबाबत ईलएसएस स्कोअर विचार घेता, सध्याच्या घडीला त्यांचा तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी कमी आहे.

उदाहरणादाखल, फ्रँकलिन इंडिया (ईएलएसएस फंड) टॅक्स सेव्हर फंडाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता ही जवळपास ५,९६२ कोटी रुपये आहे. तसेच, सध्याच्या मालमत्तेची विभागणी केल्यास लार्ज कॅपमध्ये ७८ टक्के, मिडकॅपमध्ये १८ टक्के आणि स्मॉल कॅपमध्ये ४ टक्के आहे. एकंदरीत, फ्रँकलिन इंडिया ईएलएसएस फंडाची इक्विटी होल्डिंग्स विमा, आयटी सॉफ्टवेअर आणि आराम सेवा क्षेत्रातील आहे.

Powered By Sangraha 9.0