तेल कंपन्या करणार १.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

05 Feb 2024 17:27:12
bpcl ongc oil companies invest 1 lakh crore

नवी दिल्ली : 
तेल व गॅस शोध, रिफाइनरी, पेट्रो केमिकल आणि पाईप लाईन क्षेत्रात तेल कपंन्या तब्बल १.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) समवेत सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या आगामी आर्थिक वर्षांत जवळपास १.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. सदर गुंतवणूक ही तेल व गॅस शोध, पेट्रो केमिकल त्याचबरोबर पाईन लाईन क्षेत्रात गुंतवणूक करतील. याचा फायदा सरकारला देशांतर्गत उर्जासंबंधित गरजांची पूर्तता करण्यात होईल.

दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ नुसार, आगामी आर्थिक वर्षात प्रस्तावित गुंतवणूक चालू आर्थिक वर्षातील गुंतवणूकीपेक्षा तब्बल ५ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, २०२३-२४ या आर्थिक वर्षांत पेट्रोलियम कंपन्यांची गुंतवणूक १.१२ लाख कोटी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)कडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३० टक्के अधिक म्हणजेच १३ हजार कोटी भांडवली खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0