ठाकरेंना सर्वोच्च दिलासा मिळणार का?

05 Feb 2024 13:32:08

Thackeray


नवी दिल्ली :
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली आहे.
 
याप्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अन्यथा निवडणुका होणार आहेत, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी केली होती. त्यानंतर सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने यावर सुनावणी घेण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
 
१० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला होता. मात्र, शिंदेंचा पक्षच मुळ शिवसेना असा निकाल जरी दिला गेला असला तरीही ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवण्यात आले नाही. विधानसाभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्याने कोणत्याही आमदारावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर ठाकरे गटाने आम्हाला हा निकाल मान्य नाही व आम्ही न्यायालयात जाणार अशी भूमिका घेतली असून ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंना सर्वोच्च दिलासा मिळणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.


Powered By Sangraha 9.0