सोलापूरमध्ये 'दुर्ग एक ओळख' हा अनोखा प्रयोग

05 Feb 2024 17:50:07
Solapur Durg ek olakh Initiative

सोलापूर :  सोलापूर शहरातील गणेश नाईक प्रशाळा, वी. मो मेहता प्रशाळा आणि इको फ्रेंडली क्लब, सोलापूर येथे दि. १ फेब्रुवारी रोजी दुर्ग एक ओळख या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी मुलांना परिसरातील गडकिल्ल्यांची माहिती व्हावी या करिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'मराठी कन्या ' ह्या यूट्यूब चॅनेल अंतर्गत सोलापूरातील इतिहास , गडप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी दुर्ग एक ओळख या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शालेय मुलांना तसेच प्रौढांना गडावर गेल्यावर काय बघावे ? कसे बघावे ? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक ठिकाणी भेट दिल्यावर तिथे कसे वागावे या बद्दल माहिती देणे हे या उपक्रमाचे उद्देश्य आहे.
 
गेल्या १४ वर्षांपासून अमोल जमदारे आणि स्मिता पावसकर हे दुर्गभ्रमंती त्याबाबत रंजक मजकूर तयार करत आहेत. यूट्यूबद्वारे माहिती पोहचवत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली की देत असलेली माहिती ही मोठ्यांपर्यंत पोहचते पण अगदीच लहान वयातील मुले या सर्व गोष्टीपासून दूर आहेत. २०१८ साली सुरु केलेल्या या उप्रमात महाद्वार ,बुरुज ,तटबंदी , तोफ आणि एखाद्या गडावर ज्या ज्या इमारती असतात त्यांची ओळख करून देण्यात येते.

थेट लोकांसोबत संवाद साधता येत असल्यामुळे आमचे निसर्ग , प्राणी आणि महाराष्ट्राबद्दल असलेलं प्रेम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला ह्या उपक्रमाचा उपयोग होतो. मराठी कन्या या यूट्यूब चॅनेलवर दाखवण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती सुद्धा ह्या उपक्रमात देण्यात येते.
- स्मिता पावसकर, मराठी कन्या युट्युब चॅनल
Powered By Sangraha 9.0