शिर्डी विमानतळ घेणार 'भरारी'

05 Feb 2024 20:52:15
Shirdi Airport Development

मुंबई : लाखो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत हवाई प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्यासह नवीन इमारत उभारण्याला सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

त्यानुसार, टर्मिनल उभारणी, अँप्रानचे विस्तारीकरण व इतर कामांसाठी ८७६ कोटी २५ लाख आणि उर्वरित कामांसाठी ४९० कोटी ७४ लाख अशा खर्चास कार्योत्तर मान्यता देण्यात आली. यामध्ये भुसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सर्वेक्षण व माती परिक्षण, धावपट्टीचे विस्तारीकरण आदी तांत्रिक कामांचा समावेश आहे.

शिर्डीवासीयांचे स्वप्न साकार - विखे पाटील

साईनगरी शिर्डी येथील विमानतळाचा विस्तार करण्यासोबतच अन्य विकास कामांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. त्यामुळे शिर्डी विमानतळाचा महाविस्तार होणार असून, समस्त साई भक्तांसह अवघ्या शिर्डीवासीयांचे स्वप्न साकार होणार आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

 
Powered By Sangraha 9.0