मोदींचा अपमान करणं भोवलं! राऊतांना अटक

05 Feb 2024 17:33:28

Narendra Modi


नागपूर :
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला काळे फासल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी रात्री नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
कुणाल राऊत हे काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा आहे. नागपूर जिल्हा परिषद कार्यालय परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बॅनर लावण्यात आले होते. यावर ‘मोदी सरकारची हमी’ असे लिहिले होते. दरम्यान, कुणाल राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी या बॅनरला काळे फासले. त्यानंतर पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक नियमाअंतर्गत कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला. रविवारी कुही परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे.



Powered By Sangraha 9.0