'ही' कंपनी लढतेय आपल्याच गुंतवणूकदारांशी; तरी दिले कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन

05 Feb 2024 18:17:02
BYJU's company is facing lawsuits from lenders and allegations

नवी दिल्ली : 
 'बायजू' ही भारतातील एज-टेक कंपनी असून या अंतर्गत आपल्याच गुंतवणूकदारांच्या विरोधात लढाई लढत आहे. बायजू कंपनीत तब्बल हजारो कोटींची गुंतवणूक करणाऱ्यांविरोधात बायजूकडून लढाई लढली जात असतानाच कंपनीने कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचा पगार दिला आहे. त्यामुळे बायजूमधील अंतर्गत कोलाहलामुळे इतर उद्योगांवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सदर आर्थिक संकट कसे दूर होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असेल तरी तुर्तास तरी स्टार्टअप जगतात याच्या प्रभावाची चर्चा रंगली आहे. देशातील एकेकाळी बहुचर्चित अशी बायजू कंपनीने अनेक आर्थिक आव्हांनांचा सामना केला आहे. रोख तुटवडा, आर्थिक अहवालास विलंब व कर्जदारांसोबत कायदेशीर वाद या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. कंपनीचे उत्पन्न जरी वाढत असले तरी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये एकूण खर्च ९४ टक्क्यांनी वाढून १३,६६८ कोटी रुपये होता.

Powered By Sangraha 9.0