तानसा अभयारण्यात आढळली दुर्मिळ वाघाटी

04 Feb 2024 20:20:57


rusty spotted cat

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पालघर मधील वैतरणा येथील तानसा अभारण्यामध्ये वाघाटी अर्थात (Rusty Spotted Cat) आढळली आहे. रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी ही वाघाटी (Rusty Spotted Cat) आढळली असून वन विभागाने तिचे बचावकार्य पार पाडले आहे. वाघाटीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या असून या वाघाटीला आता ठाणे येथे नेले जात असल्याची माहिती स्थानिक वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी दिली आहे.

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली वाघाटी अर्थात Rusty Spotted Cat ही मार्जार कुळातील सर्वांत लहान प्रजातींपैकी एक असून आययुसीएनच्या यादीत Near threatened या वर्गात मोडणारी प्रजाती आहे. तानसा अभयारण्यातील ही दुर्मिळ नोंद असून वाघाटीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये अशाच प्रकारे साताऱ्यामध्ये मिळालेल्या वाघाटीला दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर या वाघाटीचे प्रजनन करण्यासाठी ही प्रयत्न केले जात होते.



Powered By Sangraha 9.0