'NHIDCL' अंतर्गत विविध पदांवर काम करण्याची संधी; आजच अर्ज करा

04 Feb 2024 17:43:00
nhidcl recruitment 2024

मुंबई :
  'नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भात 'नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून यासंदर्भात अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमधील एकूण १३६ विविध रिक्त पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत. या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -
 
महाव्यवस्थापक (६ जागा)
 
उपमहाव्यवस्थापक (२२ जागा)

व्यवस्थापक (४० जागा)

उपव्यवस्थापक (२४ जागा)
 
असिस्टंट मॅनेजर (१७ जागा)

कनिष्ठ व्यवस्थापक (१९ जागा)

प्रधान खाजगी सचिव (१ जागा)
 
खाजगी सहाय्यक (७ जागा)

 
शैक्षणिक पात्रता -

संबंधित पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असेल.


वयोमर्यादा -
 
कमाल ५६ वर्षे


वेतनमान -

पदांच्या निश्चिततेनुसार वेतन नियुक्ती झालेल्या उमेदवारास देण्यात येईल.

'नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'तील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.


या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. २६ फेब्रुवारी २०२४ असेल.

भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी 'नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 
Powered By Sangraha 9.0