तुम्ही जर करदाते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची; जाणून घ्या तपशील

04 Feb 2024 12:53:12
itr-filing-services-close-big-news-for-tax-payers-website-will-remain-closed
 
मुंबई  : तुम्ही जर करदाते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आयकर विभागाचे पोर्टल पुढील दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. दि. ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देखभालीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. या कारणामुळे आयटीआर रिटर्न पुढील दोन दिवस भरता येणार नाही.

दरम्यान, आयकर विभागाकडून आपल्या करदात्यांना कळविण्यात आले आहे की, आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ३ दिवस सेवा दिली जाणार नाही. हे पोर्टल ५ फेब्रुवारी पर्यंत देखभालीमुळे बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर कोणतीही सेवा उपलब्ध होणार नाही.

आयकर विभागाकडून सर्व करदात्यांना कळवू इच्छितो की, नियमित देखभाल कार्यामुळे, ई-फायलिंग पोर्टलवरील सेवा ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी २ ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध असतील. आयकर ई-फायलिंग सेवा वापरताना वेबसाइट सुधारणे आणि वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव प्रदान करणे हा या देखरेखीचा उद्देश आहे.
Powered By Sangraha 9.0