"ताजमहलमध्ये उर्स साजरा करण्यावर बंदी घाला" - न्यायालयात याचिका दाखल

04 Feb 2024 11:55:00
 TajMahal
 
लखनौ :  उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहाल येथे मुघल शासक शाहजहानचा वार्षिक उर्स साजरा करण्याविरोधात आग्रा येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ताजमहालमध्ये होणाऱ्या उर्सला सरकारची परवानगी नाही, तरीही तो आयोजित केला जात असल्याचे हिंदू महासभेने म्हटले आहे.
 
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यां मीना देवी दिवाकर आणि सौरभ शर्मा यांनी शुक्रवारी (२ फेब्रुवारी २०२४) आग्राच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये ताजमहालमध्ये ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या शाहजहानच्या उर्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
६-८ फेब्रुवारी दरम्यान, आग्राची ताजगंज समिती मुघल शासक शाहजहानच्या मृत्यूचा ३६९ वा उर्स साजरा करेल. जे इस्लामच्या सुफी पंथाचे पालन करतात ते एखाद्या महान व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथीला उर्स आयोजित करतात. ताजगंज कमिटीचे सय्यद इब्राहिम जैदी हे आग्रा येथील ताजमहाल येथे आयोजन करत आहेत.
 
या याचिकेत हिंदू कार्यकर्त्यांनी इब्राहिम जैदी यांना प्रतिवादी बनवले आहे. हिंदू बाजू म्हणणे आहे की, ताजमहाल एएसआय संरक्षित आहे. आत उर्स साजरा करण्यासाठी एएसआयकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. ते म्हणतात की एएसआयने उर्सला परवानगी न दिल्याबद्दल माहिती अधिकारातून माहिती मिळाली आहे.
 
या उर्सचे आयोजन करणाऱ्या जैदी यांचा ताजमहालशी कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. ना तो ताजमहालचा कर्मचारी आहे ना त्याचा थेट स्मारकाशी संबंध आहे. अशा परिस्थितीत त्यांना उर्स साजरा करण्याचा अधिकार नाही.
 
हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष आणि याचिकाकर्ते सौरभ शर्मा यांनी एएसआय संरक्षित स्मारकांमध्ये कोणतेही धार्मिक कार्य केले जाऊ शकत नाही, त्यामुळे हा उर्स साजरा करणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. आग्राचे इतिहासकार राज किशोर राजे यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही याचिका दाखल केली आहे.
 
आरटीआयमध्ये त्यांनी एएसआयला विचारले की ताजमहाल कॉम्प्लेक्समध्ये 'उर्स' सोहळा आणि 'नमाज'साठी परवानगी कोणी दिली? यावर एएसआयने उत्तर दिले होते की, “मुघल, ब्रिटीश सरकार किंवा भारत सरकारने ताजमहालमध्ये ‘उर्स’ साजरा करण्याची परवानगी दिलेली नाही.”
 
 
Powered By Sangraha 9.0