उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप!

04 Feb 2024 18:40:51

Ajit Pawar


पुणे :
रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज व ओमा फाऊंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे देण्यात आलेल्या १० ई-स्कुटरचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना प्रातिनिधिक स्वरुपात हे वाटप करण्यात आले.
 
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडीला ६, होळ-६, काटेवाडी-३, लोणी भापकर-३, माळेगाव बु-४, मोरगाव-७,मुर्टी -२, पणदरे-३, सांगवी-४, शिर्सुफळ-५, बारामती नगर परिषद-७ असे एकूण ५० ई-स्कुटर वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित ४० ई-स्कुटरचे दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.
 
या स्कुटरचा उपयोग दैनंदिन आरोग्य सर्वेक्षण, गरोदर मातेच्या प्रसुतीकाळात त्यांच्यासोबत आरोग्य केंद्रात जाण्याकरीता तसेच इतर आवश्यक त्या आरोग्य सेवेसाठी आशा स्वयंसेविकांना होणार आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.



Powered By Sangraha 9.0